भारतीय पुरुषांचे पुरुषत्व नष्ट झाले असून पशुत्व जागृत करण्याची कामगिरी
आपण करून दाखवली आहे.व स्वतान्त्र्यानन्तरचे आपले एकमेव कर्तुत्व असे आहे
कि आपण पशुत्वाच्या क्षेत्रात क्रमांक १ चे स्थान गाठणार आहोत कारण हि
परिस्थिती बदलण्याची छाती व पौरुष असलेला एकही भारतीय पुरुष आज भारतात आपण
उभा करू शकलो नाही हेच कटू व विदारक असले तरी सत्य आहे.आपल्या उज्वल
परंपरांना मातीमोल करण्याची मोठी कामगिरी आपण स्वतान्त्र्यानातर बजावली
आहे. आपले वैचारिक,राजकीय व सामाजिक नेतृत्व इतके गोंधळलेले आहे कि त्यांना
फक्त पैसा,पैसा व पैसाच दिसत असून दुसरे काहीही जीवनात असू शकते ह्याचा
त्यांना विसर पडला आहे.आधुनिकतेच्या नावाखाल सर्व जीवन्मुल्याना हळू हळू
आपण फाटा द्यायला सुरवात केली आहे.मुलत आपल्या निसत्व शिक्षण पद्धतीने
पारंपारिक भारतीय पौरुषाची(ज्यात जगाला मार्गदर्शन करण्याची शक्र्ती होती)
नसबंदी करून त्याला शक्तिहीन करून टाकले व जगाकडे भोगवादी नजरेने पाहण्याचा
विकृत पशुत्वाचा झेंडा मात्र मिरवायची संधी आपण भारतीय पुरुषांना दिली
आहे. हेच आहे भारतीय पुरुषाचे वास्तव.